You are currently viewing सिंधुदुर्गातील नगरपंचायत निवडणुकांमधील ओबीसीच्या जागांच्या निवडणुका लांबणीवर

सिंधुदुर्गातील नगरपंचायत निवडणुकांमधील ओबीसीच्या जागांच्या निवडणुका लांबणीवर

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती जागांची निवडणूक पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार

ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील 27 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसीच्या जागांवर होणाऱ्या निवडणुकी संदर्भात काय निर्णय होणार याची उत्सुकता लागून राहिलेली होती. राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी यासंदर्भात 7 डिसेंबर रोजी आदेश पारित केले आहेत. या आदेशानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग च्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती या जागेच्या निवडणूक जाहीर कार्यक्रमानुसार पुढे सुरु ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ओबीसी जागांच्या निवडणुका मात्र लांबणीवर पडल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा