You are currently viewing कळसुलीतील कॉग्रेस, शिवसेनेला भाजपा चा धक्का

कळसुलीतील कॉग्रेस, शिवसेनेला भाजपा चा धक्का

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी केला भाजपा मध्ये प्रवेश

कणकवली :

कळसुली मधील शिवसेना काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये प्रवेश केला. हा सत्ताधारी शिवसेना, कॉग्रेस ला धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी या प्रसंगी सांगितले.

यावेळी कळसुली मधील कॉग्रेस विभाग अध्यक्ष प्रवीण दळवी, संतोष दळवी, कॉग्रेस बूथ सदस्य चेतन परब, काँग्रेस बूथ अध्यक्ष शैलेंद्रकुमार दळवी, हेमंत दळवी, ओमकार भावे, दिनकर लाड, विश्वनाथ लाड, श्रीनिवास गोळवणकर, प्रवीण घाडीगावकर, प्रथमेश दळवी, कळसुली विकास सेवा सोसायटी संचालक संजय दळवी यांनी भाजपा चा झेंडा हाती घेतला. यावेळी नितेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपसरपंच सचिन पारधिये, शशी राणे, ॲड. विराज भोसले, नगरसेवक रवींद्र गायकवाड, समीर सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा