You are currently viewing फोंडाघाट येथे ७ डिसेंबर रोजी पॉवरलिफ्टिंग व शरीरसौष्ठव स्पर्धा.

फोंडाघाट येथे ७ डिसेंबर रोजी पॉवरलिफ्टिंग व शरीरसौष्ठव स्पर्धा.

कणकवली

फ्यूचर फिट जिम मित्रमंडळ फोंडाघाट तर्फे देवगड, वैभववाडी, कसाल मर्यादित जूनियर सीनियर पॉवरलिफ्टिंग व शरीरसौष्ठव स्पर्धा मंगळवारी दिनांक ७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. फोंडाघाट पंचक्रोशीमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून देवगड, वैभववाडी, कसाल या भागातून निमंत्रित ७० युवक-युवती या स्पर्धेचे स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.

मंगळवारी ७ रोजी दुपारी ३ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होऊन, ३:३० वाजता पुशअप, ४ वाजता दोरी उडी, सायंकाळी ५ वाजता जूनियर पॉवर लिफ्टींग (२२ वर्षाखालील), सीनियर पॉवर लिफ्टिंग, महिला पॉवर लिफ्टिंग, रात्री८ वाजता शरीर सौष्ठव स्पर्धा म्युझिक पोज़िंग (बेस्ट पोजिंग) हे इव्हेंट होणार असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रात्री ९ वाजता होईल, या स्पर्धेमध्ये प्रेक्षक म्हणून उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन फ्यूचर फिट जिम चे संचालक अमित कदम यांनी केले आहे. स्पर्धेचे ठिकाण – फ्यूचर फिट जिम फोंडाघाट, स्पर्धा प्रवेश – फी ३०/- रुपये (सर्व स्पर्धा करिता )

प्रतिक्रिया व्यक्त करा