You are currently viewing पावशीतही विलगीकरण कक्षाचे उद्घाटन..

पावशीतही विलगीकरण कक्षाचे उद्घाटन..

कुडाळ :

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावशी गावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. त्याचे उद्घाटन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कोरोना रुग्ण आढळू नयेत म्हणून पावशीत 13 जून पर्यंत जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय कोरोना नियंत्रण ग्राम कृती समितीने घेतला आहे.

पावशी जि. प. शाळा येथे विलगीकरण पक्ष स्थापन करून दहा पुरुष व महिलांसाठी सहा बेड चे नियोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी तहसीलदार पाठक, आमदार वैभव नाईक यांच्यासह गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जि प सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, ग्रामपंचायत सदस्य सीमा खोत, चित्रा पावस्कर, वैशाली पावस्कर, माजी सरपंच श्रीपाद तवटे, चोडणकर, नानल ग्राम विकास अधिकारी सरिता धामापुरकर आदी उपस्थित होते. ग्राम कृती समितीने पावशी गावातून कोरोना  हद्दपार  करण्यासाठी गावात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.

गरम पाणी, फिल्टर पाणी, टीव्ही, जेवण, नाश्ता, चहा इत्यादी सोयींनीयुक्त असा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोना ग्राम कृती समितीकडून आवश्यक मनुष्यबळ आर्थिक मदत, वस्तू रूपातील मदत देण्यासाठी गावाला आव्हान करण्यात आले आहे. जेणेकरून सर्वांच्या सहकार्याने गाव कोरोना मुक्त होईल असे सरपंच कोरगावकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =