You are currently viewing नौदलाने उभारला जगातील सर्वात मोठा तिरंगा

नौदलाने उभारला जगातील सर्वात मोठा तिरंगा

मुंबई

जगातील सर्वात मोठा आणि वजनदार राष्ट्रध्वज भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाने मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ नौदल गोदीच्या टोकाला उभारला आहे.

225 फूट रुंद 150 फूट उंच व चौदाशे किलो वजनाचा  हा राष्ट्रध्वज खादी ग्रामोद्योग विभागाने  तयार केला आहे.

सध्या सुरु असलेल्या नौदल सप्ताहानिमित्त नौदलाचे विविध उपक्रम सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. खादीचा हा राष्ट्रध्वज धरून ठेवण्यासाठी दोन विशेष क्रेनचा वापर करण्यात आला आहे. नौदल गोदीतच हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. कालपासून हा ध्वज उभारण्याचे काम सुरु होते. एरवी खांबावर किंवा अन्य मार्गाने त्याला बांधून उभा करणे फारच कटकटीचे ठरले असते.

खांबावर उभारला असता तरी त्याची दुसरी बाजू खालच्या दिशेने झुकली असती व त्या ध्वजाचे सौंदर्य खुलून दिसले नसते. त्यामुळे त्याला ताठ उभे ठेवण्यासाठी बऱ्याच विचारांती क्रेनचा वापर करण्याचे ठरले. खादी ग्रामोद्योग विभागाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या ध्वजाची संकल्पना मांडून तो तयार केला. त्यानंतर नौदल दिनानिमित्त त्या ध्वजाचे अनावरण करून तो राष्ट्राला अर्पण करण्याची जबाबदारी नौदलाने स्वीकारली.

प्रतिक्रिया व्यक्त करा