You are currently viewing सतिश सावंत करणार ४००० जायफळ कलमांचे वाटप

सतिश सावंत करणार ४००० जायफळ कलमांचे वाटप

बीडवाडी येथे केला शुभारंभ; गुणवंत मुलांचा सत्कार

कणकवली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्यावतीने ४००० जायफळ कलमांचे वाटप होत आहे. याचा शुभारंभ ग्रामपंचायत कार्यालय बीडवाडी सभागृह येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्याहस्ते झाला. तसेच कार्यक्रमामध्ये गुणवंत मुलांचा सत्कार व पुरामध्ये नुकसान झालेल्या मणचेकर कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जायफळ लागवडीचे मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख निसार शेख, उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी, सरपंच सुदाम तेली, माजी चेअरमन दादा भोगले, उपसरपंच बावकर, पोलीस पाटील नामदेव राणे, शाखाप्रमुख पांडुरंग मगर, उमेश लाड, नाना खादारे, रामचंद्र घाडी,विश्राम लाड, लवु राणे, प्रसाद राणे, सोनू चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जायफळ कलमांचे वाटप झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =