You are currently viewing आरवली ते वेंगुर्ले रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

आरवली ते वेंगुर्ले रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वेंगुर्ले

आरवली ते वेंगुर्ले या रस्त्यावर खड्यात खड्डे असल्याने तेथील रस्त्याची दुर्दशा झाली असून दुरुस्ती न केल्यास याच रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आरवली व सागर तीर्थ गावातील ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ला यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
या कारणास्तव आरवली ते वेंगुर्ले रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकाऱ्यांनी दिल्याने आरवली ग्रामस्थांनी पुकारलेले रास्तारोको आंदोलन स्थगित केले आहे.
दरम्यान गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी आरवली येथे ग्रामस्थांची भेट घेतली व रस्त्यावरील वाढलेली झाडी स्वच्छ करण्यात आली आहेत. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी भरण्यासाठी लागणारे साहित्य टाकण्यात आले आहे .रस्ता दुरुस्तीचे काम चालू करण्यात येणार होते ,परंतु एक डिसेंबरला रात्री पासून चालू झालेल्या पावसामुळे तेथील काम चालू करणे शक्य झाले नाही. हे काम पाऊस थांबताच करण्यात येईल व तसेच तेथील वार्षिक जत्रोत्सवापूर्वी संपूर्ण धोकादायक खड्डे बुजवण्याचा प्रयत्न राहील असे लेखी आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.त्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला
यावेळी सागरतीर्थ सरपंच एकनाथ कुडव ,माजी सरपंच विठोबा बागकर, आरवली सरपंच तातोबा कुडव ,आरवली तंटामुक्त समिती अध्यक्ष मयुर आरोलकर, रवींद्र वराडकर, भगवान बागकर ,पांडुरंग फोडनाईक ,चंद्रशेखर तारीआदीसह सागर तीर्थ, आरवली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा