You are currently viewing सावंतवाडी लायन्स क्लबला प्रांतपाल कार्यक्षेत्रालील मानाचे तीन पुरस्कार प्राप्त

सावंतवाडी लायन्स क्लबला प्रांतपाल कार्यक्षेत्रालील मानाचे तीन पुरस्कार प्राप्त

क्लब सदस्यांच्या संख्येत वाढ, नूतन बांदा क्लबची स्थापना व उत्कृष्ठ झोन चेअरमन यांचा समावेश

सावंतवाडी

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी क्लबला प्रांतपाल कार्यक्षेत्रालील मानाचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये क्लब सदस्यांच्या संख्येत वाढ, नूतन बांदा क्लबची स्थापना व उत्कृष्ठ झोन चेअरमन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

सदर प्रसंगी क्लबचे अध्यक्ष अँड. ला. परिमल नाईक, सचिव ला. अमेय पई, झेड. सी. ला. अशोक देसाई, ला. विद्याधर तावडे, ला. संतोष चोडणकर, ला. मकरंद तोरसकर ला. साहिल कल्याणकर आदी उपस्थित होते. क्लबच्या यशाबद्दल सर्व ज्येष्ठ व इतर सदस्यांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा