You are currently viewing सुनीता आईर  यांना नॅशनल टीचर इनोव्हेशन अवार्ड प्रदान

सुनीता आईर  यांना नॅशनल टीचर इनोव्हेशन अवार्ड प्रदान

सावंतवाडी

स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र अर्थात सर फाऊंडेशन महाराष्ट्र आणि आय, उपक्रमशील आय. एम. अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे झालेल्या नॅशनल लेवल एज्युकेशनल इनोव्हेशन्स कॉन्फरन्समध्ये सुनीता आईर यांना नॅशनल लेव्हल ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०२१’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, आयसर पुणेचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या माजी अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे, सृष्टी, ज्ञान, हनी बी नेटवर्क या संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक चेतन पटेल, जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडीचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राजकिरण चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले, तर डॉ रामचंद्र कोरडे यांच्या हस्ते सुनिता आईर यांना नॅशनल लेव्हल ‘टीचर इनोव्हेशन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी सर फाऊंडेशन राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, अनघा जहागीरदार आदी उपस्थित होते. नॅशनल कॉन्फरन्समध्ये देशभरातील नवपक्रमशील शिक्षकांच्या नवोपक्रमाचे सादरीकरण झाले. यापैकी काही निवडक शिक्षकांना नॅशनल टीचर इनव्हेिशन अवॉर्ड हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुनीता आईर यांनी घेतलेल्या ‘स्वरचित कवितांतून अध्यापन’ या नवोपक्रमाला राष्ट्रीयस्तरावर या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले.

कॉन्फरन्समध्ये देशभरातून ३०० हून अधिक उपक्रमशील शिक्षक, शिक्षणतज्ञ, शिक्षणप्रेमी यांची उपस्थिती होती. शिक्षणात आविष्काराच्या सहाय्याने अध्यापन प्रभावी करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत यावर आधारित स्वरचित कवितांतून अध्यापन या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांचा आविष्कार विकास केला. सुनीता आईर यांना अध्यापनात जे यश आले आणि याचीच दखल घेत त्यांनी सादर केलेल्या ‘स्वरचित कवितांतून अध्यापन’ या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवडण्यात आली. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मृगनयना सावंत, केंद्रप्रमुख श्रीम.लंगवे व गटशिक्षणाधिकारी श्रीम.कल्पना बोडके तसेच शिक्षक स्टाफ व समाजातील सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 17 =