You are currently viewing बांदा स्मशानभूमीत प्रदूषण विरहीत विद्युत दाहिनीचे लोकार्पण…

बांदा स्मशानभूमीत प्रदूषण विरहीत विद्युत दाहिनीचे लोकार्पण…

बांदा
बांदा स्मशानभूमीत प्रदूषण विरहित विद्युत दाहिनी जोडण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बांद्यात अशी विद्युत दाहिनी बसविण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण बांदा स्मशानभूमीत आज व्यापारी संघ व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, राजेश विरनोडकर, जावेद खतीब, अंकिता देसाई, किशोरी बांदेकर, उमांगी मयेकर, रिया आल्मेडा, समीक्षा सावंत, स्वप्नाली पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, व्यापारी संघाचे खजिनदार मंगलदास साळगावकर, सतीश येडवे, सुनील धामापूरकर, संजय सावंत, सुभाष शिरोडकर, अभय सातार्डेकर आदी उपस्थित होते.

यावेळी अक्रम खान म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर बांदा ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच विद्युत दाहिनी स्मशानभूमीत बसविली आहे. यामुळे वेळेची व लाकडाची बचत होणार आहे. तसेच प्रदूषण देखील कमी होणार आहे. केवळ २ तासात दहन प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी केवळ १० टक्के लाकडे वापरण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =