You are currently viewing श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. अनिल गवळी सेवानिवृत्त

श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. अनिल गवळी सेवानिवृत्त

श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. अनिल गवळी सेवानिवृत्त

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित
श्री पंचम खेमराज कनिष्ठ महावाद्यालय तथा राजमाता सत्वशिलादेवी भोंसले कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा.अनिल गवळी हे आपल्या नियत वयोमानानुसार महाविद्यालयामधून सेवाानवृत्त झाले. त्यांनी महाविद्यालयात एकूण 30 वर्षे सेवा केली. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेम सावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब श्रीमंत सौ. शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गणपतीची मुर्ती, देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल.भारमल , प्रा. डीडी गोडकर, प्रा.सौ.निलम धुरी,डॉ.सौ.पी जी नाईक, प्रा. एम.बी बर्गे, डाॅ.जी.एस.मर्गज, डॉ.सुधीर बुवा , डॉ. योगेश पवार, डाॅ.संदीप पाटील, सौ.स्वाती सावंत, सौ.केसरकर,प्रा. एस एस खोत ,प्रा. सौ. पुनम सावंत ,सौ.कल्पना लोबो, सौ. माधुरी ठाणेकर, प्रा. अमोल कांबळे, प्रा. रोहन सावंत, श्री पंढरीनाथ सनम व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले. प्रा.अनिल गवळी हे अतीशय प्रामाणिक व आपल्या कामाशी एकरुप होते असे त्यांनी सांगीतले. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले यानी प्रा. गवळी हे संयमी,समाधानी आणि प्रत्येक कामाला सकारात्मक प्रतीसाद देणारे शिक्षक आहेत असे गौरवोद्गार काढले. संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ.शुभदादेवी भोंसले यांनी प्रा. गवळी यांनी कोणतेही काम कधी नाही म्हटले नाही. ते सर्वासोबत एकोप्याने राहायचे असे सांगीतले. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले व युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.प्रा. अमोल कांबळे,सौ.पुनम सावंत, सौ .माधुरी ठाणेकर, प्रा. रोहन सावंत, प्रा.डी.डी.गोडकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली , त्यांंची स्वभाव वैशीष्ठ्ये सांगीतली. सत्काराला उत्तर देताना प्रा.गवळी यांनी संस्थेचे आभार मानले व सर्व सहकारयांचे सहकार्य मिळाले त्यामुळेच सेवा करणे शक्य झाले असे सांगीतले.

*संवाद मीडिया*

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा