You are currently viewing मंत्री अनिल परब यांची हतबलता आणि आम.नितेश राणे यांचे मालवणी बोलीभाषेतील ट्विट..

मंत्री अनिल परब यांची हतबलता आणि आम.नितेश राणे यांचे मालवणी बोलीभाषेतील ट्विट..

आम.राणे यांच्या मालवणी ट्विट ची राज्यभर चर्चा

कणकवली :

भाजपा आमदार नितेश राणे यांनी  परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दल घडत असलेल्या घटनांचा मालवणी शब्दात चांगलाच  समाचार घेतला आहे.कलानगर येथील साहेबाने माजी खासदार किरीट सोमय्या पासून वाचवले नाही. तुझ तू बघून घे असे सांगून उद्धव ठाकरे यांनी हात वरकेले.अशा आशयाच्या मालवणी बोलीभाषेत शब्दांकन केलेले ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.

शिवसेनेत नाचक्की झालेल्या मंत्री परब यांचे चित्रण केलेले आमदार राणे यांनी ट्विट पुढील प्रमाणे

“आमचे हरकुळचे परब..,गेले त्यांच्या कलानगरच्या  सायबा कडे..!

सायबाक सांगितल्यानी..,सोमय्या पासून माका वाचवा..

मात्र सायबाण उत्तर दिल्यान,,तू तुझा बघून घे…

आता कळला ना परबांनू, आम्ही काय बोलत होतव ते ..!

तुमचा स्वागत आसा… !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − four =