You are currently viewing बांदा केंद्र शाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

बांदा केंद्र शाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

बांदा

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं 1 येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांच्या वतीने लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा उलगडा मराठी,हिंदी व इंग्रजी भाषणातून केला. यावेळी शाळेतील विद्यार्थी कैवल्य संदेश आरोलकर यांनी लोकमान्य टिळकांची लक्षवेधी वेशभूषा केली होती .कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शालेय मंत्रीमंडळ यांनी परिश्रम घेतले . यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक,रसिका मालवणकर , पदवीधर शिक्षका उर्मिला मोर्ये, जागृती धूरी ,शुभेच्छा सावंत,वंदना शितोळे , शितल गवस, रंगनाथ परब ,जे.डी.पाटील, प्रशांत पवार, गोपाळ साबळे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − eleven =