You are currently viewing बस्ती (पंचकर्म) part 2
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

बस्ती (पंचकर्म) part 2

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या, बियोंड सेक्स कादंबरीच्या लेखिका, मॉडेल सोनल गोडबोले यांचा लेख…

काल मी लिहिलेल्या बस्ती या लेखावर वाचकांचे अनेक फोन आणि मेसेजेस आले. बस्ती म्हणजे काय माहीत नसावं यासारखं दुर्भाग्य काय . प्राचीन काळापासून आपल्या शरीराची आतुन स्वच्छता करण्यासाठी वापरण्यात येणारी आयुर्वेदीक पध्दत. आपण जिथे रहातो तिथे आसपास आयुर्वेदीक डॉक्टर पंचकर्म स्पेशालिस्ट असतील त्यांना भेटा आणि पंचकर्म बद्दल जाणुन घ्या. त्याबद्दल गुगलवर सुध्दा तुम्हाला बेसिक माहीती मिळु शकेल. आपण वाचत नाही आणि निरीक्षण शक्ती तर त्याहूनही नाही. Wp मेसेजेस पुढे पाठवताना त्यात काही उपयुक्त माहीती आहे का जरुर पहा आणि आयुर्वेदीक डॉक्टर यांनी यावर जरुर मार्गदर्शन करावे कारण मी डॉक्टर नाही पण गेली १० वर्षे न चुकता बस्ती करत असल्याने मला मिळणारे फायदे काय आहेत ते माझ्या वाचकाना सांगायचे होते. Oil pulling हाही अतिशय उत्तम प्राचीन प्रकार आहे. त्याचेही व्हीडीओ यूट्यूबवर आहेत तेही जरुर पहा.. माझ्या चॅनलवर सेक्सरसाईजमधे मी याचा उल्लेख केलाय. मैद्यापासून बनवलेली बिस्किटस किवा मैद्याच्या रोट्या खाताना तो मैदा आतड्याना चिकटुन रहातो परिणामी आजाराला आमंत्रण त्याऐवजी भाकरी भाजी खा. होटेल मधे मैद्याच्या रोट्या भरताना पाहिले की मनापासुन दुख होते . आपला आकार काय आहे याकडेही लक्ष नसतं., फुकट मिळालं की हाणायचं हेच चित्र खूपदा ड्रिंक्स करणाऱ्यामधेही दिसतं. शरीर फुकट मिळालय त्याची आपल्याला पर्वा नाही हेच खरं, निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करणं तर दुरचीच गोष्ट.
पंचकर्मामधे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण हे पाच तर अनेक उपप्रकार आहेत.. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार कुठला बस्ती द्यायचा आणि किती दिवस द्यायचा हे डॉक्टर सांगतात. मी दरवर्षी सात दिवस करते त्यामध्ये एक दिवस तेलाचा बस्ती आणि एक दिवस काढ्याचा बस्ती असतो त्यासोबत पोट आणि कंबर यला मसाज आणि वाफ असते. बस्ती करुन तुम्ही तुमचे रोजचे रुटीन चालु ठेवु शकता.. मी इतकं जरुर सांगेन जो दरवर्षी बस्ती करतो आणि व्यायाम आणि योग्य वेळी घरचं जेवतो त्याला शक्यतो वर्षभर एकही गोळी घ्यायची गरज पडत नाही. पार्टी ला जा.. एंजॉय करा.. मित्रमैत्रीणीना भेटा पण मैदा मसाले यापसुन सावधान. काल मी एका पार्टी ला गेले होते.. सगळे जेवले. मी घरुन जेवुन गेले तिथे फक्त ग्रीन टी घेतला हा स्वतःवर ताबा असलाच पाहिजे.. ठरवलं तर सगळं जमतं. आयुष्य सुंदर आहे, पहा विचार करुन..

सोनल गोडबोले
लेखिका.. बियॉन्ड सेक्स

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + eight =