You are currently viewing डिगस येथील श्री काळंबा देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

डिगस येथील श्री काळंबा देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

कुडाळ

डिगसवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणा-या म्हणून ख्याती असलेल्या डिगस (ता.कुडाळ) गावची ग्रामदेवता श्री देवी काळंबा मातेचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दि.३ डिसेंबर २०२१ रोजी साजरा होत आहे.
यानिमित्ताने सकाळी श्रींची विधिवत पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, दिवसभर श्रींचे दर्शन, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, रात्री ११ वा.पालखी प्रदक्षिणा, १२ वा. आजगांवकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सर्व भाविक भक्तांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व मानकरी, श्री काळंबा देवी देवस्थान उपसमिती डिगस व डिगस ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा