मनसे सिंधुदूर्ग तर्फे जिल्हा रुग्णालय परिचारिकांसाठी चहा-कॉफी मशीनचे लोकार्पण.

मनसे सिंधुदूर्ग तर्फे जिल्हा रुग्णालय परिचारिकांसाठी चहा-कॉफी मशीनचे लोकार्पण.

सिंधुदूर्ग :

मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज ८ जून सकाळी १० वाजता  मनसेच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील  परिचारिकांसाठी चहा-कॉफीचे मशीन भेट देण्यात आले. दरम्यान याप्रसंगी कोरोना काळात काम करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ परिचरिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला.

सौ. ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मनसेच्या वतीने श्री.उपरकर यांनी जिल्हा रुग्णालयात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या परिचरिकांसाठी अत्याधुनिक चहा-कॉफी मशीन भेट दिली. जिल्हा शल्य चिकित्सक श्री.श्रीपाद पाटील यांचे हस्ते मशीनचे औपचारिक उद्धाटन करण्यात आले.यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,मालवण विनोद सांडव, जिल्हा सचिव बाळा पावसकर,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,निखिल गावडे आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.या मशीनच्या माध्यमातून मनसेने केलेल्या सन्मानाने परिचारकांनी मनसेचे आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा