You are currently viewing रस्त्याचे आरक्षण आणि बांधकाम चौकशीबाबत केली जात आहे दिरंगाई – रमेश करंगुटकर

रस्त्याचे आरक्षण आणि बांधकाम चौकशीबाबत केली जात आहे दिरंगाई – रमेश करंगुटकर

पुन्हा एकदा वेधले निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष

मालवण

मालवण शहरातील एका सर्व्हे नंबरवरील प्रॉपर्टीमध्ये २० फूट रुंदीच्या रस्त्याचे आरक्षण आणि त्यावरील बांधकामाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक रमेश करंगुटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र मागणीस प्रतिसाद न मिळाल्याने करंगुटकर यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मालवण शहरातील एका सर्व्हे नंबरवरील प्रॉपर्टीमध्ये २० फूट रुंदीच्या रस्त्याचे आरक्षण आणि त्यावरील बांधकामाची चौकशी करून कारवाई करावी, असा मागणी अर्ज त्यांनी फेब्रुवारी आणि एप्रिल २०१८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. मात्र, ३० ते ३१ महिने झाले, तरी आपल्याला अद्याप उत्तर मिळालेले नाही. आपल्या मागणीसाठी रमेश करंगुटकर यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. यासंदर्भात संबंधित विभागांकडे सातत्याने फेऱ्या मारून आणि पाठपुरावा करून आपण थकलो आहोत. तरीही आपल्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आरक्षित जागेवर बांधकाम करण्यात आल्याने आपल्या घराकडे जाणारा रस्ता अडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेऊन आम्हा कुटुंबियांचा रस्त्याचा प्रश्न सोडवावा, असे करंगुटकर यांनी १८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − three =