You are currently viewing सावली जनसेवा शिक्षण संस्थेच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

सावली जनसेवा शिक्षण संस्थेच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात अनेक उपक्रम

कणकवली

सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडेच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला जातो. त्यानुसार यावेळी देखील जिल्हा परिषद शाळा बिडवाडी, वरवडे, पिसेकामते आदि शाळांमधील विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून वह्या, पेन्सिल, कंपास आधी शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष सचिन देसाई, कार्याध्यक्ष सुशांत दळवी, सचिव उद्धव शिंदे, खजिनदार विजय चिंदरकर, पप्पू पुजारे , प्रसाद देसाई, सदा चव्हाण, अभिषेक देसाई, कुणाल देसाई, अजय घाडी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा