राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुक्यातील भाजपा व इतर कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी दिगवळे येथील संदेश पवार, मंदार पवार, अमित पवार, भरत देसाई, फोंडाघाट येथील जयेश लक्ष्मण चव्हाण, राजेंद्र सावळाराम चव्हाण, दीपक सावळाराम चव्हाण, सुवर्णा सुरेश जाधव,शिवचंदन प्रकाश शिवगण, सुभद्रा लक्ष्मण चव्हाण, आरती अरुण सुतार, सरिता शिवाजी चव्हाण, शुभांगी शंकर राणे, वैभवी विजय राणे, कुपवडे येथील स्वप्नील नामदेव परब वैभवी विष्णु गावकर, अभिषेक चंदू सावंत आदींसह भाजपा व इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

या पुढच्या काळात राष्ट्रवादीची वाटचाल जिल्ह्यात आणखीन जोरात होणार आहे. अजूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षात यायला इच्छुक असून जिल्ह्यात भाजपला आणखीन मोठे धक्के दिले जाणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा