You are currently viewing केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचे उदघाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचे उदघाटन

ओरोस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उदघाटन मोठ्या शानदार सोहळ्यात संपन्न झाले. प्रथम फीत कापून आणि फलकाचे अनावरण करून आणि दीपप्रज्वलन करून हे उदघाटन करण्यात आले.

यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, यांच्या सह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,भजपा केंद्रीय सचिव विनोद तावडे,  माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह, आम.निरंजन डावखरे, कॉलेजच्या अध्यक्षा सौ.निलमताई राणे, माजी खासदार,भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, आम.प्रसाद लाड, अतुल काळसेकर, यांच्या सह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =