You are currently viewing भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नवलराज काळे यांचा केला सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी सन्मान

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नवलराज काळे यांचा केला सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी सन्मान

राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदावर ती निवड झाली ही गावासाठी अभिमानास्पद गोष्ट _मासिक सभेत घेण्यात आला अभिनंदनाचा ठराव

वैभववाडी-

वैभववाडी तालुक्याचे सडूरे गावचे सुपुत्र ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली. या निवडीबद्दल नवलराज काळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असताना.ते कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतीत मासिक सभेमध्ये त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. राष्ट्रीय पक्षाच्या व देशात एक नंबर असणाऱ्या पक्षाच्या जिल्हा लेवलच्या पदावर ती निवड झाली ही गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असे बोलत नवलराज काळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. काळे यांना पुष्पगुच्छ देताना गावचे प्रभारी सरपंच संतोष पाटील, ग्रामसेवक प्रशांत जाधव, ग्रामपंचायत सदस्या आकांशा जंगम, कल्पना पाटील, पुनम रामाने, लक्ष्मीबाई बोडेकर, रोजगार सेवक दीपक भावे,ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत,अशोक पाटील इत्यादी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =