You are currently viewing माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल पुरस्कार जाहीर

माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल पुरस्कार जाहीर

वेंगुर्ले:

 

देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून वेंगुर्ले महानगरपालिकेचा लौकिक करण्यात महत्त्वाचे योगदान दिलेले येथील पालिकेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण या संस्थतर्फे भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा ‘कोकण व्हिजन २०३०’चे आयोजन १६ जुलैला सायंकाळी मुंबई दादर (पूर्व) हिंदू कॉलनी येथील प्रा. बी. एन. वैद्य सभागृहांत होणार असून यावेळी गिरप यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती शिवरायांच्या परिवारातले तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले, छत्रपती शिवरायांचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक या मान्यवरांच्या उपस्थितीत कोकण आयडॉल पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा