You are currently viewing आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

कणकवली

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेस ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील प्रथम तीन यशस्वी विद्यार्थी- १)कु.चैतन्य श्रीकांत दळवी, २)कु.सई राजीव डामरी,३) कु. कृष्णाई राजेश लाड उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील पाहिले तीन विद्यार्थी १) कु.सृष्टी संतोष जोगळे २) कु.शुभंकर सुधीर कुबल. ३) कु. ओम संदेश सावंत विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, सचिव प्रा.श्री.हरिभाऊ भिसे,कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर ,खजिनदार सौ.शीतल सावंत ,सल्लागार श्री.डी. पी.तानावडे, आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेआहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा