You are currently viewing १६ ऑगस्टला होणार जिल्हास्तरीय महिलांची नारळ लढवणे स्पर्धा

१६ ऑगस्टला होणार जिल्हास्तरीय महिलांची नारळ लढवणे स्पर्धा

शिल्पा खोत यांची माहिती

 

मालवण :

तालुक्यातील शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केली जाणारी सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव असणारी सर्वात मोठी जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता भरड दत्तमंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. नारळी पौर्णिमा निमित्ताने होणारी ही स्पर्धा जोरदार पाऊस वाऱ्यामुळे स्थगित करण्यात आली होती हवामान विभागाचे अंदाजानुसार अजून काही दिवस पावसाची शक्यता असल्याने भरड दत्त मंदिर येथील पटांगण परिसरात स्वराज्य ढोल ताशा पथकांच्या गरजात ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आयोजकांच्या वतीने बैठक घेऊन स्पर्धेची जागा व तारीख निश्चित करण्यात आली अस्सल सोन्याची चार नाणे सोन्या-चांदीपासून बनलेला आकर्षक मार्ग सोन्याची नथ चांदीची दिवे पैठणी अशा लाख कोणत्या बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती आयोजक शिल्पा खोत व यतीन खोत यांनी दिली. यावेळी सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील पाच महिलांचा प्रतिनिधी सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =