You are currently viewing एसटी विभागीय कार्यशाळेबाहेर भाजपचे लाक्षणिक उपोषण सुरू

एसटी विभागीय कार्यशाळेबाहेर भाजपचे लाक्षणिक उपोषण सुरू

एसटी विभागीय कार्यशाळेबाहेर भाजपचे लाक्षणिक उपोषण सुरू

शिशिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

एसटीचे अधिकारी कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप

कणकवली :

कार्यालयीन वेळेत पक्षीय आंदोलनात सहभागी होत असल्या प्रकरणी यापूर्वी लक्ष वेधून देखील कोणतीही कारवाई केली नसल्याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेचे पदाधिकारी गितेश कडू यांच्या विरोधात एसटी विभागीय कार्यशाळेत समोर आज बुधवारी सकाळपासूनच लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रश्नी एसटी प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. या उपोषणात तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सदस्य महेश लाड, सचिन परधीये, अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, नितीन पाडावे, गणेश तळगावकर, राजू पेडणेकर, संतोष पुजारे, विजय चिंदरकर, समीर प्रभुगावकर, सुभाष मालंडकर, सागर राणे, प्रवीण दळवी,मिलींद लाड, भाई सावंत, सचिन खेडेकर, राजा डीचोलकर, शशी राणे, महेंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा