You are currently viewing शिरोडा, वेंगुर्ले, मालवणला मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिरे

शिरोडा, वेंगुर्ले, मालवणला मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिरे

शिरोडा, वेंगुर्ले, मालवणला मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिरे*

वेंगुर्ले

अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर व सिंधुदुर्ग विविध सरकारी रुग्णालय यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर रविवार, २० एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १- शिरोडा उपजिल्हा रुग्णालय, दुपारी ३ ते ५ – वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय व सोमवार, २१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत मालवण सरकारी रुग्णालय येथे आयोजित केले आहे.

शिबिरांमध्ये मोफत हृदयविकार, अँजिओग्राफी, पित्ताशयातील खडे, मुतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व्ह बदलणे, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे, हाडाचे फॅक्चर, सर्व प्रकारचे कॅन्सर,केमोथेरपी, डायलेसीस, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, वाढलेल्या थायरॉईड गाठीवर मायक्रोवेव्हद्वारे (विनाऑप्रेशन) अत्याधुनिक उपचार, विनाटाके गर्भाशय गाठीवर उपचार, पायांची पेरिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेहमुळे पायाला झालेली इजा), प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशनवर उपचार व मोफत ऑपरेशन सर्व रेशनकार्ड व आधारकार्डधारकांवर करण्यात येणार आहेत. सवलतीच्या दरात ऑपरेशन हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, फिशर, फिस्टुला मणका, गुडघे व खुबा काविषयी मार्गदर्शन प्रत्यारोपण याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शिबिरादिवशी ईसीजी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात येणार आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी संबंधित रुग्णांनी आपल्या नाव नोंदणीसाठी-८९२८७३६९९९ या नंबरवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा