You are currently viewing दोडामार्ग येथे पहिल्यांदाच रंगलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

दोडामार्ग येथे पहिल्यांदाच रंगलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

*उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन*

*दोडामार्गाच्या विकासासाठी भविष्यात खारीचा वाटा माझा असेल –  विशाल परब

*विशाल परब यूवाई साठी आयडॉल – विवेकानंद नाईक*

 

दोडामार्ग :

भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग शहरात सुशीला हॉल मध्ये पहिल्यांदाच रंगलेल्या भव्य न्यू होम मिनिस्टर स्पर्धेला दोडामार्ग तालुक्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. युवा उद्योजक विशाल परब पुरस्कृत व नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या टीमने ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे दोडामार्ग मधील अनेक महिलांना मोठ्या व्यासपीठावर व दिग्गज सिने अभनेता क्रांती मळेगावकर सोबत रंगतदार खेळ पैठणीचा खेळता आला. विशाल परब आप आगे बडो हम आपके साथ है असा विश्वास यावेळी आयोजक चेतन चव्हाण यांची टीम आणि मोठ्या संख्येने या न्यू होम मिनिस्टर स्पर्धेसाठी उपस्थित महिलांनी विशाल परब यांना दिला. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ९ ऑक्टोबर पासून जिल्ह्यात विशाल पर्वाला सुरवात झाली आहे. संपूर्ण आठवडा भर चालणाऱ्या या विविध कार्यक्रमांचा शुभारंभ माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. सिने अभिनेता क्रांती माळेगावकर यांच्यासारखा दिग्गज कलावंत दोडामार्ग तालुक्यातील महिला आणि नागरिकांना जवळून पाहता आला. तर त्यांच्यासोबत महिला भगिनींना भव्य खेळ पैठणीचा खेळून आपल्यातील गुणांना मोठ्या व्यासपीठावर सादरीकरण करता आले हे विशेष.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला तालुका म्हणजे दोडामार्ग तालुका होय. दोडामार्ग तालुका निसर्ग सौंदर्याने उत्कृष्ठ आहे. मात्र या तालुक्याचा झपाट्याने विकास होणे आवश्यक आहे. आपल्या येणाऱ्या पिढीने आपले नाव आदराने घ्यावे यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी स्वतः हा दोडामार्ग तालुक्याचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी प्रयत्नरथ राहणार असून यासाठी सर्वांच्याच सहकार्याची आवश्यकता असल्याचे भाजप युवा नेते विशाल परब यांनी स्पष्ट केले. दोडामार्ग तालुक्यात प्रथमच आयोजित झालेल्या न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा ह्या तुफान विनोदी कार्यक्रमाने उपस्थित सर्वांचीच मने जिंकली. न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या प्रथम मानकरी कसई – दोडामार्ग येथील गावडेवाडी मधील प्रिया गुरुप्रसाद गावडे या ठरल्या.

विशाल परब हे आज यूवाई साठी आयडॉल आहेत. मुलाने असं कार्य केल पाहिजे की, त्याच्या आई वडिलांची ओळख मुलाच्या नावाने झाली पाहिजे, असच अभिमानास्पद काम विशाल परब करत आहेत. असे प्रतिपादन विवेकानंद नाईक यांनी केलं. विशाल परब यांनी या जिल्ह्यात वैभववाडी ते दोडामार्ग इथपर्यंत जोडलेली माणसे हेच त्यांचे वैभव आहे असेही श्री. नाईक म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, नगरसेवक नितीन मनेरकर, नगरसेवीका गौरी पार्सेकर, नगरसेवीका क्रांती जाधव, नगरसेवीका संजना म्हावळकर, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, प्रभाकर परब, सौ. प्रमिला परब, विकास परब, माजी तालुकाध्यक्ष प्रविण गवस, सरपंच संघटना अध्यक्ष देवेंद्र शेटकर, माजी नगरसेवक समीर रेडकर, सामजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा