बांधकाम कामगारांना किटचे वाटप….

बांधकाम कामगारांना किटचे वाटप….

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांना किट वाटप करण्यात येणार आहे. सदर किट वाटप हे दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी कणकवली, तरंदळे फाटा, गावडे गॅरेजच्या बाजूला होणार आहे.

          सदर किट मिळण्यासाठी बांधकाम कामगारांनी पुढील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. कामगारांचे मूळ ओळखपत्र, ओळखपत्र पानाची 2 झेरॉक्स, नुतनिकरण पानाची 2 झेरॉक्स, आधारकार्ड 2 झेरॉक्स, बँक पासबूक 2 झेरॉक्स, 90 दिवस काम केलेल्या पुस्तकातील पानाची 2 झेरॉक्स, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला 2 झेरॉक्स, दिनांक 27 जानेवारी 2020 पर्यंत नोंदणी असल्यास जिवित कामगारांना किट मिळणार आहे. दिनांक 1 जानेवारी 1960 व त्या अगोदर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना किट्स मिळणार नाहीत.

          तरी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून कणकवली येथील तरंदळे फाटा, गावडे गॅरेजच्या बाजूला येथे कामगारांनी किट्स घ्यावेत असे आवाहन श्री. टेंबुलकर, सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा