कासार्डे मध्ये जिल्हास्तरीय सलाड सजावट स्पर्धेचे आयोजन..

कासार्डे मध्ये जिल्हास्तरीय सलाड सजावट स्पर्धेचे आयोजन..

कासार्डे :

 

डॉ. अनिल नेरूरकर पुरस्कृत तंबाखू प्रतिबंध अभियान, तळेरेच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  जिल्हास्तरीय सलाड डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये फळ व भाज्या यांची सजावट अपेक्षित असून यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धक १३ जून पर्यंत सहभाग घेऊ शकतात. लॉकडाऊनमुळे मुले आणि पालकांमध्ये स्पर्धेच्या माध्यमातून पोषक आहाराची जनजागृती होऊ शकेल. कोरोना काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे आहार यांचे सेवन करणे. भविष्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सकस आहाराच्या माध्यमातून मुलांना सदृढ ठेवणे. हा या स्पर्धे मागील मुख्य हेतू आहे. ही स्पर्धा ५ ते ११ वर्षे आणि त्यापुढील अशा दोन गटात होणार आहे. प्रथम ३ विजेत्यांना रोख रक्कम व सहभागी सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी https://forms.gle/u5yhDeseF-2vvRBK6 या लिंक वर अर्ज भरून घेता येईल. याबाबत अधिक माहितीसाठी श्रावणी कम्प्युटर तळेरे येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा