You are currently viewing सिंधुदुर्गच्या मास्टर्स खेळाडूंचे ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात घवघवीत यश

सिंधुदुर्गच्या मास्टर्स खेळाडूंचे ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात घवघवीत यश

वेंगुर्ले:

मास्टर्स गेम्स असोसिएशन, महाराष्ट्र व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर, पुणे यांच्या विद्यमाने आयोजित ” २री महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स स्पर्धा २०२१ ” २५ ते २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी इंदापूर, पुणे येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ, जेष्ठ पुरुष व महिला मास्टर्स खेळाडूंनी ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवले. तसेच प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंची नांवे खालील प्रमाणे –४०+वर्षाच्या महिला खेळाडू कणकवली तालुका सौ. सुवर्णा अभिजीत जोशी यांनी लांबउडीमध्ये रौप्यपदक व हातोडा फेक मध्ये रौप्यपदक तसेच बॅडमिंटन ऐकेरी व दुहेरी मध्ये सुवर्ण पदक मिळवले.
कुडाळ तालुका सौ. अनुष्का अजय गावडे यांनी ८०मी. अडथळा शर्यत मध्ये सुवर्ण पदक , ४०० मी मध्ये रौप्यपदक मिळवले, ४०+ वर्षाच्या पुरुष खेळाडू कुडाळ तालुका दिपक राजाराम कुंभार यांनी २०० मी. मध्ये रौप्यपदक, १५००मी.

मध्ये सुवर्ण पदक व लांबउडीमध्ये कास्य पदक मिळवले. सावंतवाडी तालुका चंद्रकांत बापू शिंदे यांनी ४०० मी. मध्ये कास्य पदक मिळवले. ५०+ महिला खेळाडू कुडाळ तालुका सौ.

माधुरी खराडे यांनी ५००० मी. चालणे मध्ये सुवर्ण पदक, तिहेरी उडी मध्ये रौप्यपदक, हातोडा फेक मध्ये सुवर्ण पदक व ४ ×१०० मी. रिले मध्ये सुवर्ण पदक मिळवले. ४०+ पुरुष खेळाडू मालवण तालुका समीर जयवंत राऊत यांनी ५००० मी.

चालणेमध्ये रौप्यपदक मिळवले. तसेच या विजयी खेळाडूंची निवड तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून संघटनेचे सचिव बयाजी बुराण यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने विजय मिळवल्या बद्दल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल रावराणे व उपाध्यक्ष अनिल हळदिवे व सर्व कार्यकारी मंडळ यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा