You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिला सैन्य अधिकारी लेफ्टनंट दिपाली गावकर हिचे बाल दिनाच्या दिवशी सैनिक स्कूलमध्ये स्वागत व सन्मान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिला सैन्य अधिकारी लेफ्टनंट दिपाली गावकर हिचे बाल दिनाच्या दिवशी सैनिक स्कूलमध्ये स्वागत व सन्मान

आंबोली

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली आणि सिंधुदुर्ग डिस्टिक एक्स सर्विस मॅन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गातील पहिली महिला अधिकारी लेफ्टनंट दिपाली गावकर हिचे सैनिक स्कूल आंबोली येथे सैनिकी परंपरेनुसार मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आले. संस्थेचे सचिव सुनील राऊळ यांच्या प्रस्तावनामध्ये सैनिक स्कूलच्या स्थापने मागील उद्देश व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील एका मुलीने ग्रामीण भागात शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची कामगिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद करण्यासाठी आहे. याचा आदर्श सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. त्यानंतर ऑ.कॅप्टन दिनानाथ सावंत यांच्या हस्ते लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. लेफ्टनंट दिपाली गावकर यांच्या मातोश्री सौ. वर्षा गावकर यांचा देखील आय. इ. एस. एल. सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष सुभेदार शशिकांत गावडे आणि सैनिक पतसंस्थेचे चेअरमन सुभेदार मेजर शिवराम जोशी यांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील बाव गावातील एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी ते सैन्य अधिकारी लेफ्टनंट बनण्यापर्यंतचा प्रवास, अनुभव त्यांनी सैनिक स्कूलच्या बालसैनिकांसमोर कथन केला
SSB मुलाखतीला सामोरे जाताना सकारात्मक दृष्टिकोन, प्रामाणिकपणा, सचोटी, अपयशाने खचून न जाता नेहमी प्रयत्नशील राहावे असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला त्याचबरोबर SSB मधील विविध चाचण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढविण्यामध्ये लेफ्टनंट दिपाली गावकर यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी ठरले.

यावेळी सैनिक स्कूलचे संचालक शिवाजी परब, आप्पा राऊळ, शंकर गावडे, जॉय डान्टस, राजाराम वळंजु, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, सैनिक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हिंदबाळ केळुस्कर, संचालक मंगेश गावकर, भिवा गावडे, चंद्रकांत शिरसाठ व आय.इ.एस.एल चे पदाधिकारी दीपक राऊळ, कुडाळ तालुकाध्यक्ष कॅप्टन विक्टर पिंटो, कृष्णा परब, सदानंद मोहिते, एस.एम. चंद्रशेखर जोशी, आत्माराम गावडे, आदींसह अनेक माजी सैनिक तसेच सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. आर. गावडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षक नितीन गावडे यांनी केले. कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे तसेच सर्व संचालक व मान्यवरांचे आभार शाळेचे प्राचार्य एस.टी. गावडे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − five =