You are currently viewing बांद्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

बांद्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

बांदा
बांदा गवळीटेंब येथील सुधीर दिलीप वराडकर (४२) या तरुणाने गळफास घेत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. घरानजीक असलेल्या फणसाच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तो टोलनाक्यावर कामाला होता. स्थानिकांनी मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा