You are currently viewing जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार निवारण समितीत अध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार निवारण समितीत अध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध,मनाई व निवारण) अधिनियम,2013 व नियम दिनांक 09 डिसेंबर 2013 अन्येये जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार निवारण समितीतील अध्यक्ष व सदस्य पदासाठी जिल्हायातील इच्छूक उमेदवारांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असून समितीमधील अध्यक्ष व सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी पुढीलप्रमाणे अर्हताकरी निकष दिनांक 11 सप्टेंबर 2014 रोजींच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये अन्वेय प्रस्तावित केलेले आहेत.

          अध्यक्ष पदासाठी,- 5 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव. महिलांच्या क्षेत्रात कामकाज अनुभव व महिलांच्या हक्कासाठी, सोयीसाठी बांधील.

सदस्य पदासाठी,- अशासकीय संघटना, संघ किंवा लैगिक छळाच्या प्रश्नांशी संबंधित कामाचा अनुभव. किमान 3 वर्षे.  कायद्याच्या क्षेत्रातील ज्ञान असल्यास प्राधान्य.

               इच्छूकांनी दिनांक 20 जून 2021 पुर्वी प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत  A.ब्लॉक,तळमजला,  ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे सादर करावेत. या विषयी अधिक माहितीसाठी 02362-228869, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी येथे संपर्क साधावा, असे आवाहन व्ही.सी. म्हात्रे,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − sixteen =