You are currently viewing सडूरे येथील कै.बिरू शिवाजी काळे यांच्या मुलाला आमदार नितेश राणे यांनी केली आर्थिक मदत

सडूरे येथील कै.बिरू शिवाजी काळे यांच्या मुलाला आमदार नितेश राणे यांनी केली आर्थिक मदत

भाजपा भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी घेतला पुढाकार

वैभववाडी

सडूरे गावातील कै.बिरू शिवाजी काळे हे 14 सप्टेंबर रोजी शेतात जातो असे सांगून घरातून निघून गेले ते त्या दिवसापासून बेपत्ता झाले होते. 05 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह सुख नदीपात्रात भेटला, त्यांच्या घरातली परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, त्यांच्या पश्चात आई, बायको, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबियांवर ती शोककळा पसरली आहे. या घटनेची कल्पना भाजप भटके-विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा सडूरे शिराळेचे ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे यांना दिली होती.बिरू काळे यांचा मुलगा मनोज बिरू काळे यांची दोन दिवसापूर्वी वैभववाडी दौऱ्यावर असणाऱ्या आमदार नितेशजी राणे साहेब यांची काळे यांनी भेट घडवून आणली.यावेळी आमदार नितेश राणे यांनी मनोज काळे यांचे सांत्वन केले व त्याला आर्थिक मदत केली. यापुढेही काही मदत लागल्यास निश्चिंत सांग असे सांगितले व आपले शिक्षण चालू ठेव आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत असा विश्वास दिला. कै.बीरू काळे यांचा मुलगा मनोज काळे याने आमदार नितेश राणे यांचे आभार मानले. यावेळी तालुका अध्यक्ष नाशिर काझी, पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे, पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, कोकिसरे गावचे सरपंच सावंत, बंड्या मांजरेकर, संजय सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शासनाची अधिक मदत मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा भटके-विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे प्रयत्न करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा