You are currently viewing दिग्विजय फडके यांची महाराष्ट्रातील निवडक दहा नवोपक्रमशील शिक्षकामध्ये निवड

दिग्विजय फडके यांची महाराष्ट्रातील निवडक दहा नवोपक्रमशील शिक्षकामध्ये निवड

दोडामार्ग

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संशोधन विभागामार्फत सन 2020-21 या वर्षी प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटात राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली होती या राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत श्री सातेरी जि.प.केंद्रशाळा साटेली भेडशी (ता दोडामार्ग जि सिंधुदुर्ग) या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिग्विजय नागोजी फडके यांनी सादर केलेल्या नवोपक्रमाला राज्य स्तरावर यश प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील निवडक दहा नवोपक्रमामध्ये निवड झाली आहे.
या राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम जिल्ह्यातून 36 नवोपक्रमातून 7 नवोपक्रम निवडले गेले या मध्ये श्री फडके यांचा चौथा क्रमांक नंतर या 7 नवोपक्रमाचे ऑनलाईन कार्यशाळा घेऊन सादरीकरण घेण्यात आले यातून जिल्हयात उत्कृष्ट 5 नवोपक्रम निवडले त्यात तिसरा क्रमांक आला हे 5 नवोपक्रम राज्य स्तरावर मूल्यांकनासाठी पाठविले राज्यातील 36जिल्ह्यातून 140 नवोपक्रमातून राज्यात उत्कृष्ट 10 नवोपक्रम निवडले त्या नवोपक्रमामध्ये श्री दिग्विजय फडके यांचा प्रथम फेरीत राज्यात प्रथम क्रमांक आला. दिग्विजय फडके यांनी Enrichment of English in rural areas students through English Apps …हा नवोपक्रम शाळेत राबविला त्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यासाठी त्यांना सिंधुदुर्ग डाएट चे प्राचार्य प्रकाश जाधव, संशोधन विभाग प्रमुख लवू आचरेकर, अधिव्याखाता श्री गावडे, गट शिक्षण अधिकारी शोभराज शेर्लेकर शिक्षण विस्तार अधिकारी छाया बाळेकुंद्री, साटेली भेडशी केंद्र प्रमुख सूर्यकांत नाईक मुख्याध्यापिका पूनम पालव व शाळेतील सर्व शिक्षक दीपक दळवी, संपदा दळवी,संजीवनी आवडण या सर्वांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =