You are currently viewing नगराध्यक्ष संजू परब यांना त्या विधानाबद्दल काँग्रेस कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांचा इशारा..

नगराध्यक्ष संजू परब यांना त्या विधानाबद्दल काँग्रेस कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांचा इशारा..

अन्यथा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत परिणाम दिसतील…

कणकवली

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून टीका करताना कहा ” राजा भोज कहा गंगू तेली “असा उल्लेख केला त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने संजू परब यांचा निषेध करत आहोत. त्यांनी दिलगिरी व्यक्त करून आपले विधान मागे घ्यावे.
संजू परब यांना हि पण माहिती नसेल की त्यांच्या भाजप पक्षाचे असलेले देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी हे सुद्धा तेली समाजाचे आहेत.
तरी संजू परब यांनी आपले विधान मागे घ्यावे नाही तर आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील शेवटी काय तर संजू परबांची “विनाशकाले विपरीत बुद्धि” अशी त्यांची अवस्था झाली आहे.
कणकवली शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस यांनी आपला पाठिंबा सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजास दिला आहे
असे विधान कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 2 =