You are currently viewing इन्सुली सुतगिरणीच्या जागेवर रोजगाराची दालने उभी करा

इन्सुली सुतगिरणीच्या जागेवर रोजगाराची दालने उभी करा

शेतकरी व मिल कामगारांची मागणी;केंद्रीय मंत्री नारायण राणेंना निवेदन सादर

बांदा

इन्सुली सूतगिरणीच्या जागेवर रोजगाराची दालने किंवा उद्योग व्यवसाय निर्माण करा,अशी मागणी येथील शेतकरी व मिल कामगारांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे करण्यात आली. कवडीमोल भावाने जमिनी घेऊन सुद्धा संबंधित जमिनीत अद्यापपर्यंत कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही.त्यामुळे यावर सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.नक्कीच पाठपुरावा करू असे आश्‍वासन श्री राणे यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा