You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते संतोष गावस यांनी केले  जिओचं काम बंद

सामाजिक कार्यकर्ते संतोष गावस यांनी केले  जिओचं काम बंद

रस्त्याच्या दुतर्फा खोदाई होत असल्यामुळे संतोष गावास झाले आक्रमक

सावंतवाडी

शहरात सध्या जिओची खोदाई सुरू असून संचयनी येथे एका बाजूने खोदाई काम होत असताना देखील दुसऱ्या बाजूने देखील खोदाई करण्याचा घाट jio नं घातला आहे. एकाबाजूला मातीचा ढीग पडला असताना दुसरी बाजू खणायचा कार्यक्रम आखला आहे. याला स्थानिकांनी कडाडून विरोध करत काम बंद पाडल.
स्थानिक नागरिक तौकिर शेख, संतोष गांवस यांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद पाडल. एका बाजूनं खणल्यानं वाहतुकीसाठी व रहदारीसाठी नागरिकांना त्रास होत आहे. त्यात एक काम अर्धवट असताना दुसरी खोदाई केल्यास नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तर दोन्हीबाजून रस्ता बंद केल्यानं वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस देखील उपस्थित नसून कामाचे ठेकेदार, सुपरव्हायझर घटनास्थळी उपस्थित नाही आहे. दरम्यान, या कामाबाबत मुख्याधिकारी यांना संपर्क केला असता त्या अनभिज्ञ होत्या. तर कर्मचाऱ्यांना पाठवते अशी माहिती देऊन तब्बल अर्धा तास एकही अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल नव्हता.

प्रतिक्रिया व्यक्त करा