You are currently viewing दे दान सुटे गिराण

दे दान सुटे गिराण

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

तुझाच देवा आम्हा भरवसा
तुलाच घालतो आण
दे दान सुटे गिराण

हवा तेवढा पाउस नाही
थोडे शेत हि भिजले नाहि
कसा येवू वारीस विठ्ठला
पुरता मी हॆराण….… दे दान सुटे गिराण

म्हणे मुलांना शाळा शिकवा
खेटे घालुन आला थकवा
प्रवेशास ना अजून पत्ता
म्हणती पॆसा आण….दे दान सुटे गिराण

नोकरीस मी अर्ज टाकले
मुलाखतिंचे नाटक झाले
असुन पात्रता नाही वशिला
तुला न याची जाण….. दे दान सुटे गिराण

घर झाले पण नाही शहरी
ईंजिनियर वा नसे डोक्टरी
वय झाले पण स्विकारणार्या
इथे मुलिंची वाण……. दे दान सुटे गिराण

आतां वाटे बसू मंदिरी
तुझ्या पुढ्यातच तिथे पंढरि
हात कटीचे काढी देवा
अथवा घेई प्राण…… दे दान सुटे गिराण

घेई आतां अवतार पुन्हा रे
जगणे देखिल इथे गुन्हा रे
चंद्र सूर्य सांवलीत कशाला
त्या ग्रहणाचे भान….. दे दान सुटे गिराण

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =