You are currently viewing देवगड जामसंडे हद्दीतील प्रलंबित घरबांधणी परवानगी प्रकरणे मार्गी लावणार – आम.नितेश राणे

देवगड जामसंडे हद्दीतील प्रलंबित घरबांधणी परवानगी प्रकरणे मार्गी लावणार – आम.नितेश राणे

देवगड

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील घर परवानगीची ४८ प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी १३ प्रकरणे ही सीआरझेड अंतर्गत प्रलंबित आहेत उर्वरित प्रकरणे सहहिश्शेदार यांची परवानगी, एन ए वन्य कारणास्त्व व प्रलंबित आहेत यासंदर्भात ही सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरिता विशेष बैठक पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत सिआरझेडच्या बाबतीत सकारात्मक दृष्ट्या निर्णय घेऊन मार्गी लावण्यात येतील. अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात नगराध्यक्ष, उपनगराध्य, नगरसेवक, मुख्यधिकारी अभियंता यांचे समवेत या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर ,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर ,प्रणाली माने ,उपस्थित होत्या. या पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील ४८ घरबांधणीची प्रकरणे परवानगी प्रलंबित आहेत त्यात १३घरबांधणी परवांगी प्रकरणी सीआरझेडच्या अटीमुळे प्रलंबित आहेत. या घरबांधणी लवकरात परवानगी लवकरात लवकर मिळावी यासाठी पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक देवगड येथे लावण्यात येऊन या सर्व परवान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील त्याच बरोबर उर्वरित प्रकरणेही सहहिशेदार परवानगी अथवा एन ए व अन्य कारणास्तव प्रलंबित असून नगर पंचायती अंतर्गत एक विशेष कॅम्प चे आयोजन १डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे उपस्थित रल या कॅम्प मध्ये घरबांधणी संदर्भाची प्रलंबित प्रकरणे आवश्यक ती कागदपत्रे घेऊन संबंधितानी उपस्थित राहून त्याच वेळी त्याना घरबांधणी परवानगी देण्यात येईल.आवश्यक कागदपत्रांची माहिती हवी असेल त्यांनी नगरपंचायत चे अधिकारी अथवा नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

या सर्व प्रलंबित प्रकरणांची आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ती प्रकरणे मार्गी लावण्यात येतील त्याचबरोबर यातील २४ प्रकरणे अनधिकृत बांधकाम प्रकरणी प्रलंबित असून त्यात काही निवासी व वाणिज्य प्रकरणे प्रलंबित आहेत. या २४ लोकांसमवेत हीदेखील बैठक घेऊन त्यांच्याशी नगरपंचायत संपर्क करेल व योग्य ती चर्चा करून त्याबाबत आवश्यक तो निर्णय अथवा घरबांधणी परवानगी देणारे देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले .सद्यस्थितीत देवगड जामसंडे नगर पंचायात हद्दीतील घर बांधणी केलेल्या नागरिका आपल्यावर कारवाई होईल अशी भीती वाटेत आहे या प्रयत्नांमुळे देवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न व प्रलंबित प्रकरणे त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे प्रयत्न आपण आमदार या नात्याने करण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

देवगड येथे पर्यटकांना आकर्षित करणारे येथील गार्डन शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबरपासून सकाळी ६ वाजल्यापासून नागरिकांना खुले करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे पर्यटकांचे आकर्षण कंटेनर सिनेमा गृह,वॅक्स म्युझिअम ,वॉटर एटीएम देखील येत्या काही दिवसात नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा