You are currently viewing पुणे खराडीमधील सराईत गुन्हेगाराचा खून….

पुणे खराडीमधील सराईत गुन्हेगाराचा खून….

 

पुणे:

 

पुणे शहरातील खराडीत पूर्ववैमनस्यातून रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराचा रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांनी बांबूने मारहाण आणि पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून निर्घृणपणे खून केला.

 

खून झालेल्या तरुणाचे नाव शैलेश दत्तात्रय घाडगे (वय – ३३, रा. चौधरी वस्ती, शांतीनगर, खराडी) असे आहे. खून झालेल्या तरुणाचा भाऊ निलेश दत्तात्रय घाडगे याने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश घाडगे याचे जुलै २०१६ रोजी राजू अस्वले, सुमित वाकडे आणि सुमित खेडकर यांच्यासोबत भांडणे झाली होती. पोलिसांनी अस्वले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ३ महिन्यांपूर्वी अस्वले याने शैलेशच्या भावाला मोबाइलवरून शिवीगाळ केल्यामुळे शैलेश चिडलेला होता. रविवारी शैलेश हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी मोटरसायकलवरून निघून गेला आणि राजू अस्वलेला मारण्यासाठी त्याचा शोध घेऊ लागला. याच संधीचा डाव साधून खराडीतील एका हॉटेलच्या बाजूला तिघांनी शैलेश घाडगे याला बांबूने बेदम मारहाण करुन पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून त्याचा ठेचून खून केला. आज सोमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस येताच घटनास्थळी चंदननगर पोलिसांनी धाव घेतली. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + two =