You are currently viewing तालुकास्तरावर आरटीओ कॅम्प पूर्ववत करा…

तालुकास्तरावर आरटीओ कॅम्प पूर्ववत करा…

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी

सावंतवाडी

तालुका व शहर ठिकाणी सध्या दळणवळणाची व्यवस्था नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत वाहन धारकांसाठी लायसन्स, लर्निंग लायसन्स, लायसन्स टेस्ट, पासिंग व इतर छोट्या मोठ्या कामांसाठी तालुका स्तरावर पूर्वीप्रमाणे कॅम्प सुरू करण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की आपल्या जिल्ह्यात साधारणत: आठ तालुके असून तालुक्याची व्याप्ती मोठी आहे तालुका व शहर या ठिकाणी सध्या दळणवळणाची व्यवस्था नसल्याने लोकांना गैरसोयीचे होत आहे. आतातर एस.टी. सुध्दा संपात आहे अशा वेळी आर.टी.ओ. सिंधुदुर्ग ओरोस या ठिकाणी असल्याने ओरोस येथे पोचणे सुद्धा अडचणीचे झाले आहे. तरी परिवहन अधिकाऱ्यांनी खास बाब म्हणून लोकांच्या सेवेसाठी ठिक-ठिकाणी कॅम्प लावणे गरजेचे आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =