You are currently viewing जिल्हा ग्रामीण रस्ता परिसंवादाचे आयोजन

जिल्हा ग्रामीण रस्ता परिसंवादाचे आयोजन

कुडाळ :

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तर्फे ‘भारताच्या स्वातंत्रतेचे ७५ वे अमृत महोत्सव’ निमीत्त पंचायत समिती कुडाळ च्या आवारात २७ ऑगस्टला ग्रामिण रस्ते बांधकामामध्ये प्र.मं.ग्रा.स.यो.चे महत्त्व टप्पा-3 बाबत माहिती तसेच रस्त्यांच्या बांधकामाकरीता वापरण्यात येणारे नविन तंत्रज्ञान या विषयावर ‘परिसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यापुर्वी ग्राम विकास मंत्रायल तथा केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय नवी दिल्ली मार्फत रस्त्यालगल वृक्ष लागवडीचा कार्यक्रम देशभरात हाती घेण्यात आलेला होता. आता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची माहिती व नविन तंत्रज्ञान या विषयावर प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग कार्यालयात परिसंवाद आयोजीत केला होता. या परिसंवादात प्रधानमंत्री ग्रामसडक येाजनेच्या रस्ता कामांची माहिती बांधकामाकरीता वापरण्यात येणारे नविन तंत्रज्ञान माहिती तसेच रस्ता पुर्ण झालेवर त्याचा देखभाल दुरुस्ती कशी असते त्या बाबतची माहिती कार्यकारी अभियंता अजित पाटील यांनी उपस्थित लोंकाना दिली.

तसेच कार्यालयाचे उपअभियंता गोविदं चव्हाण यानी प्रधानमंत्री ग्रामसडक येाजनेचा उद्देश व त्याची व्याप्ती लोकांना समजावून सांगीतली. तसेच कनिष्ठ अभियंता धर्णे यांनी डोंगर भागात रस्त्यांची कामे करताना कश्या प्रकारे नैसगीक समस्यांना तोंड देऊन कामे पुर्ण केली त्याबददल सांगीतले. सदर कामाचे सादरीकरण गणेश बागयतकर व उमा सावंत, सुशांत जाधव यांनी केले. सदर सेमीनार ला कार्यकारी अभियंता अजित पाटील, उप अभियंता गोविद चव्हाण तसेच प्रधानमंत्री ग्रामसकडक योजनेचे कर्मचारी, मक्तेदार, लोकप्रतीनीधी, व इतर ग्रामस्थ उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =