वेंगुर्ले शिवसेनेतर्फे मंगळवारपासून शिवसेना शाखेमध्ये सुरु होणार शिवभोजन थाळी – यशवंत परब

वेंगुर्ले शिवसेनेतर्फे मंगळवारपासून शिवसेना शाखेमध्ये सुरु होणार शिवभोजन थाळी – यशवंत परब

वेंगुर्ला

वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे मोफत शिवभोजन थाळीचा शुभारंभ उद्या मंगळवार दि. 4 मे पासून वेंगुर्ले तालुका शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय, सुंदरभाटले, वेंगुर्ले येथे होणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील परप्रांतीय मजुरांना तसेच निराधारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात त्यांच्या खाण्या जेवणाची व्यवस्था व्हावी. या उद्देशाने राज्यातील आघाडी शासनाने आघाडी शासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शिवभोजन थाळीच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांना तसेच त्या भागातील निराधारांना याचा लाभ व्हावा यासाठी शासनामार्फत शिवभोजन थाळी राबविण्यात आलेली आहे.

मात्र वेंगुर्ले तालुक्यात सदर शिवभोजन थाळी चालू करण्याकरिता मक्त्यासाठी नोंदणी केलेली नसल्याने अद्याप वेंगुर्ले तालुक्यात शिवभोजन थाळी चालू झालेली नाही. त्यामुळे परप्रांतीय मजूर व निराधारांना शासनाच्या कोरोना काळातील लढ्यामुळे उपासमारीची वेळ येऊ नये. त्याकरिता खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी तालुक्यासाठी शिवभोजन थाळीचे नियोजन करीत वेंगुर्ला तालुका संपर्क शाखा सुंदरभाटले वेंगुर्ले येथे मंगळवार दिनांक 4 मे पासून दररोज 100 ताटांची शिवभोजन थाळी सुरू करण्यात येत असल्याची माहिती वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा