You are currently viewing माणुसकी गेली संपावर.. ‘अच्छे दिन’ पहा पेट्रोल पंपावर..

माणुसकी गेली संपावर.. ‘अच्छे दिन’ पहा पेट्रोल पंपावर..

पेट्रोल 114 रुपये,डिझेल 103 रुपये तर घरगुती गॅस 913 एवढा इंधन दरवाढीचा उच्चांक..

मात्र केंद्रासह राज्यातील सत्ताधारी एकमेकांविरोधात कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त… प्रसाद गावडे

इंधन पुरवठ्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार अक्षरशः वसुली केंद्र चालवत आहेत की अशी परिस्थिती आहे.एकीकडे पेट्रोलचे दर 114.34 रुपये,डिझेल 102.84 रुपये, घरगुती गॅस 913 अशी भरमसाठ इंधन दरवाढ होऊन महागाईने उच्चांक गाठलेला आहे मात्र दुसरीकडे केंद्रातील भाजप व राज्यातील आघाडीतील घटक सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष एकमेकांविरोधात बोट दाखवून जबाबदारीतून पळ काढत आहेत.कोविड आपत्तीनंतर वाढलेली बेरोजगारी व त्यात उत्तुंग शिखरावर पोहचलेली महागाई अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस जगण्यासाठी संघर्ष करतोय मात्र केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षांना त्याचं सोयर सुतक उरलेलं नाही.कॅमेरासमोर येऊन वायफळ बडबड करण्यापेक्षा गोरगरीब कष्टकरी जनतेला दिलासा देण्याची खरी गरज आहे.परदेशात पेट्रोल वाढ झाली तर जनता रस्त्यावर गाड्या लावून सरकार विरोधात निषेध नोंदवते मग आपल्याकडे उद्रेक दिसणार तरी कधी..? जनतेने देखील हताश होऊन दिवस मोजण्यापेक्षा उठाव करण्याची खरी गरज आहे.तरच परिस्थितीत सुधारणा घडू शकेल अन्यथा गेंड्याची कातडी पांघरून सत्तेत बसलेले हे मुजोर पक्ष दखलही घेणार नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा