You are currently viewing कणकवली वासियांची विचारपूस …

कणकवली वासियांची विचारपूस …

गैरसोय टाळण्यासाठी नगरसेविका सुप्रियाताईंचे प्रयत्न…

कणकवली वासियांना दिलासा

कणकवली

रुग्णांची संख्या वाढत असल्याने कणकवली शहरात जनता कर्फ्यू चालू आहे. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी 22 सप्टेंबरला वॉर्डनिहाय जाऊन लोकांच्या गैरसोयी जाणून घेत त्या निवारण्याचे आवाहन नगरसेवकांना केले होते.


जनता कर्फ्यु हा लोकांच्या मागणीनुसार केला असून त्यात लोकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी मात्र कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष आणि नगरसेवक जातीने लक्ष देऊन घेत आहेत. बुधवारी नगरसेवकांनी प्रभागवार नागरिकांशी संवाद साधला. नगरसेविका सुप्रियाताई नलावडे आपल्या प्रभागात वॉर्ड नंबर 6 आणि वॉर्ड नंबर 7 बाजारपेठ मध्ये अत्यावश्यक सेवेची चौकशी करताना दिसत होत्या. त्यांनी नागरिकांची आस्थेने चौकशी केली. जनता कर्फ्यू काळात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सुप्रियाताई कटाक्षाने काळजी घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + seven =