You are currently viewing मनसेकडून मालवण तहसिल कार्यालयाबाहेर घंटानाद व टाळ वाजवा आंदोलन…

मनसेकडून मालवण तहसिल कार्यालयाबाहेर घंटानाद व टाळ वाजवा आंदोलन…

घरात झोपुन बसलेल्या राज्य सरकारला जागं करण्यासाठी आंदोलन – इब्रामपूरकर, सांडव

मालवण तहसिलदार कार्यालयाबाहेर अधिकाऱ्यांना दिले निवेदन

मालवण

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी मनसेने शुक्रवारी मालवण तहसिल कार्यालया बाहेर घंटानाद व टाळ वाजवा आंदोलन केले. मंदिरे बंद असल्याने मंदिराच्या परिसरातील छोट्या विक्रेत्यांची उपासमार होत आहे. राज्य शासन मॉल्स, दारूची दुकानं उघडू शकतं, बससेवा सुरू करू शकतं, जीम आणि ग्रंथालयं सुरू करू शकतं, मग मंदिरं का उघडू शकत नाही ? असा सवाल  मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थानं भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र महाराष्ट्रात अद्यापही मंदिरं अथवा धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. सिंधुदुर्गातील तसेच मालवण तालुक्यातील मंदिरं उघडण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी या मागणीसाठी शुक्रवारी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली  मनसेच्यावतीने तहसिलदार कार्यालयाबाहेर घंटानाद  व टाळवाजवा आंदोलन करण्यात आले. मंदिरे बंद असल्याने पूजारी, मंदिराच्या आजूबाजूच्या लोकांचा, देवदेवतांची पूजाअर्चा करणार्‍या भाविकांचा, भक्तगणांचा राज्य सरकारने विचार केला आहे का ? असा सवाल श्री. इब्रामपुरकर यांनी केला. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, उपतालुकाध्यक्ष उदय गावडे, उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, गुरु तोडणकर, विशाल माडये, राजेश परब, साईराज चव्हाण, दत्तराज चव्हाण, नंदकिशोर गावडे, विनीत कांदळगांवकर, विजय गावडे, सिद्धेश मयेकर, संदीप मुणगेकर, हरेश भिसळे, प्रसाद बापर्डेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 2 =