You are currently viewing कणकवली वागदे येथे चिरे वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने तीन जण जखमी

कणकवली वागदे येथे चिरे वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने तीन जण जखमी

कणकवली वागदे येथे चिरे वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने तीन जण जखमी

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चिरे वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. यात तीन जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच हायवे महामार्ग पोलीस तसेच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते. त्यामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्त्यावरील चिरे तसेच चिऱ्यांची पडलेली लालबुंद माती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस सुरळीत करण्यात आला.
या अपघातात प्रसाद आहेर (वय २१ तळेबाजार ), किशोर जंगले (वय ३० पिसेकामते ), दिलीप शेलार (वय ५५ नांदगाव ) हे किरकोळ जखमी झाले. अपघातातील जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या अपघात प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री. वंजारे हे अधिक माहिती घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा