You are currently viewing संवाद मीडियाच्या पहिल्या दिवाळी अंकाबाबत प्राथमिक शिक्षिका सौ.आदिती मसुरकर, प्राथमिक शाळा मिटक्याची वाडी, पावशी, कुडाळ यांचा अभिप्राय

संवाद मीडियाच्या पहिल्या दिवाळी अंकाबाबत प्राथमिक शिक्षिका सौ.आदिती मसुरकर, प्राथमिक शाळा मिटक्याची वाडी, पावशी, कुडाळ यांचा अभिप्राय

*अभिप्राय*

*संवाद दिवाळी अंक मिळाला.🙏🙏*

या अंकातील प्रत्येक लेखन साहित्याची मांडणी खूप सुटसुटीत पद्धतीने केली आहे.
एका विद्यार्थिनीने रेखाटलेल्या सुंदर चित्राचे मुखपृष्ठ वाचकाला आकर्षित करते.
दर्जेदार लेख, अप्रतिम काव्यरचना यामुळे एकदा हाती घेतलेला अंक पुन्हा खाली ठेवावासा वाटत नाही.
अधल्या मधल्या पानांवरील चौकटीतील अलकही मनावर एक संदेश कोरून ठेवतात.
बऱ्याचदा असे अंक जाहिरातींनी भरलेले असतात. वाचनीय साहित्य खूप अल्प प्रमाणात असतं. पण या अंकात मात्र तसे आढळले नाही.

*🙏🙏 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा*

*सौ. आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा