You are currently viewing सावंतवाडी न.पा.तर्फे स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत २० नोव्हेंबरपासून विविध स्पर्धा

सावंतवाडी न.पा.तर्फे स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत २० नोव्हेंबरपासून विविध स्पर्धा

सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत २० नोव्हेंबर पासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी २० नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद आरोग्य विभाग येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करणे आवश्यक असून स्पर्धेचे ठिकाण जनरल जगन्नाथराव भोसले हे आहे.

या स्पर्धेत दि.२१ नोव्हेंबर रोजी चित्रकला स्पर्धा वेळ सकाळी आठ ते दहा विषय एक स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत कचरा कमी करण्यासाठी तीन आर (रिड्युस-रियुज-रिसायकल) या प्रणालीचा अंगिकार, २. प्लास्टिकचा वापर जगाला हनिकरक.
दि.२१ नोव्हेंबर- निबंध स्पर्धा वेळ सकाळी अकरा विषय स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा.
२. स्वच्छ भारत हरित भारत असा आमच्या स्वप्नातील भारत. ३.स्वच्छता ही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी, ४. भारतातील स्वच्छ भारत अभियान कशाप्रकारे सहाय्यभूत ठरेल. स्पर्धेचे ठिकाणी श्री पंचम खेमराज महाविद्यालय आहे ‌

दि.२२ नोव्हेंबर- घोषवाक्य वाक्य स्पर्धा ( २२ नोव्हेंबर पर्यंत लखोट्यामध्ये मध्ये नगरपरिषद कार्यालयात आरोग्य विभागात आणून देणे. विषय- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान असा आहे.

दि.२३नोव्हेंबर रोजी वाद विवाद स्पर्धा (२२ नोव्हेंबर पर्यंत आरोग्य विभाग येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करणे) वेळ सकाळी ११ वाजता विषय १. स्वच्छ भारत अभियान पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे का. २- स्वच्छता ही माझ्या देशभक्ती पेक्षा श्रेष्ठ आहे का.३- स्वच्छ भारत अभियान सहा दशकांच्या स्वातंत्र्यानंतर अशा उपक्रमाची गरज का भासली ? स्थळ श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे होईल.

दि.२३ नोव्हेंबर दुपारी २ वाजता विषय- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २

( दि.२२ नोव्हेंबर पर्यंत आरोग्य विभाग येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.)दि.२३ नोव्हेंबर प्रश्नमंजुषा स्पर्धा सायंकाळी ४ वाजता विषय- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २ (२२ नोव्हेंबर पर्यंत आरोग्य विभाग येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करणे). दि.२७ नोव्हेंबर जिंगल – २७ नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद आरोग्य विभागात पेन ड्राइव्ह वरून आणून द्यावे. विषय- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ कचऱ्याचे वर्गीकरण चार प्रकारांमध्ये करणे व माझी वसुंधरा अभियान.( २५ नोव्हेंबर पर्यंत आरोग्यविभाग येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करणे) आवश्यक आहे.

दि.२७ नोव्हेंबर शाॅर्टफिल्म-२७ नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद कार्यालय आरोग्य विभागात पेन ड्राइव्ह वरून आणून द्यावेत. विषय – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.( २५ नोव्हेंबर पर्यंत आरोग्य विभाग येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करणे)
दि.२८ नोव्हेंबर- सुंदर हस्ताक्षर स्पर्धा -२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विषय- स्पर्धेच्या वेळी मजकूर देण्यात येईल.( २५ नोव्हेंबर पर्यंत आरोग्य विभाग येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करणे) स्थळ श्री पंचम खेमराज महाविद्यालय आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्पर्धा सावंतवाडी नगरपरिषदेच्या नागरिकांकरिता मर्यादित राहिल. नागरिकांनी सहभागी व्हावे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अनुक्रमे शाळा व महाविद्यालय येथे नोंदणी करून शाळा व महाविद्यालयांनी एकत्रित नोंदणी नगरपरिषद कार्यालयात करावी, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी संजिता मोहपात्रा यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 14 =